नगरमध्ये 19 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोमवारी पाठविलेले 19 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. या व्यक्ती जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी हॉटस्पॉट केंद्र झाले आहेत. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी जाणारे रस्तेही बंद केलेले आहेत. यामध्ये नगर शहरातील मुकुंद नगर, जामखेड ,संगमनेर आदी भागांचा यामध्ये समावेश आहे. तसेच नेवासा तालुकाही लोकांकडून बंद करण्यात आला आहे. तेथेही प्रशासनाने विशेष खबरदारी देण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे सोमवारपासून विविध ठिकाणी पथक नेमून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.