कोरोना रुग्णसंख्येची घसरण कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना रुग्णसंख्येची घसरण कायम असून आज दिवसभरात 1 हजार 331 रुग्ण सापडले तर 11 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱया सक्रिय रुग्णांच्या संख्येतही एकाच दिवसांत अडीच हजारांची घसरण झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजार 178 वरून आज 22 हजार 742 वर पोहोचली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवडय़ांपासून झपाटय़ाने कमी झाली असून 67 हजारांवर पोहोचलेली सक्रिय रुग्णांची संख्याही आता कमी होऊन 22 हजार 742 वर पोहोचली आहे. यात मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, देशभरात राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 220 कोटी 60 लाख नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय  आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात 179 रुग्ण, दोघांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 179 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. 137 जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात 8 हजार 518 चाचण्या झाल्या. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 567 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत दिवसभरात 56 कोरोना रुग्ण सापडले तर 47 जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत आज 1 हजार 515 चाचण्या झाल्या तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 429 वर पोहोचली आहे.