कोल्हापुरात कोरोनाचा पहिला बळी, 60 वर्षीय वृध्दाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापुरात आज कोरोनाचा पहिला बळी गेला. गेल्या दहा दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात (सीपीआर) उपचार सुरू असलेल्या इचलकरंजीच्या 60 वर्षीय वृध्दाचा आज गुरुवारी (दि.३०एप्रिल) रोजी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी मृत्यू झाला. यासंदर्भात संध्याकाळी उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.दरम्यानरा या वृध्दाच्या संपर्कात आल्याने त्यांचा चार वर्षाच्या नातवालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर इचलकरंजीच्या आयजीएम रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

इंचलकरंजीच्या कोले मळा परिसरातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी विजापूर येथून काही जण इचलकरंजी येथे आले होते. यातील दोघांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यानंतर इचलकरंजी येथील संबंधित 19 जणांना क्वारंटाईन केले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर या कुटुंबाच्या घरासमोर राहणाऱ्या आणि कोणतीही प्रवासाची हिस्ट्री नसणाऱ्या या वृध्दास कोरोनाची लागण झाल्याने,आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांची कोरोना तपासणी झाली असता. यामध्ये वृध्दाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या चार वर्षाच्या नातवाला कोरोना झाल्याने इंचलकरजीकर धास्तावले होते. संबंधित वृद्धास मधुमेहाचा त्रास असल्याने, पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते.आज दहा दिवसानंतर या वृध्दाच्या मृत्यूने वस्त्रनगरी हादरुन गेली आहे .आतापर्यंत जिल्ह्यात 14 जण कोरोना पाॅझीटिव्ह असून चार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.