कोरोना सर्वेक्षणाच्या नावाखाली भाजप मतदारांची माहिती गोळा करत असल्याचा काँग्रेस नेत्याचा आरोप

1340

कोरोना व्हायरसच्या सामुदायिक सर्वेक्षणाच्या नावाखाली 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची माहिती गोळा करण्याचा छुपा अजेंडा सरकार राबवत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. गोव्यात 7 हजार बिगर वैद्यकीय सरकारी कर्मचारी सुमारे 3.75 लाख घरांना भेटी देणार आहेत. या सर्वेक्षणामुळेच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याचे चोडणकर यांचे म्हणणे असून सामुदायिक सर्वेक्षणाचा हा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

या सर्वेक्षणात केवळ प्रश्नोत्तरेच आहेत. हे सर्वेक्षण खरोखरच भिलवाडाच्या धर्तीवर होणार आहे का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. काँग्रेस सरकारद्वारे भिलवाडामध्ये वैद्यकीय तसेच रुग्ण सेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांची चाचणी आणि स्क्रीनिंग करण्यात आले होते. पण गोव्यात मात्र बिगर वैद्यकीय सरकारी कर्मचाऱ्यांना यात ओढल्याचे चोडणकरांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या