प्रशासनाच्या सूचना धुडकावून जावई आले, झाली कोरोनाची लागण

2060

परळी वैजनाथ – बीड मध्ये काल रात्री आलेल्या रिपोर्टमधील परळी तालुक्यातील हाळम येथील 2 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहून हाळम येथे आलेल्या लेक जावयामुळे पहिल्यांदाच परळी तालुक्यात रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला आहे. मुंबई दहीसर येथे राहणारे हे कुटुंब सेलमोहा ता.गंगाखेड येथील आहे. त्यांना त्यांच्या गावातच क्वारंटाईन व्हायला सांगण्यात आले होते असे असतानाही ते एका जीपने उजनी ता.अंबाजोगाई येथे उतरले. नंतर त्यांनी परळी तालुक्यातील हाळम हे गाव गाठले अशी माहिती ग्रामस्थांकडून समजली आहे.

धर्मापुरी प्रा.आ.केंद्राला सदरील माहिती मिळताच डॉ.माढे यांनी चौकशी करून तपासणी केली असता ते ज्या गाडीने मुंबईहून आले होते त्या गाडीतील एकाचा कोरोनाने लातूर येथे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. सकाळी या गाडीचा चालकही (पाटोदा ता. अहमदपूर) पॉझिटीव्ह आढळून आला असल्याचे समजते. यातील महिलेचं माहेर हाळम आहे. त्यामुळे परळीत लेक आणि जावयाने कोरोना आणल्याची चर्चा नागरिकांत होत आहे. बीड जिल्ह्यात आज रात्री आलेल्या रिपोर्ट मध्ये परळी तालुक्यातील हाळम येथील 2, पाटोदा तालुक्यातील वाहली 1 कारेगाव 1, शिरुर तालुक्यातील बारगजवाडी येथील 2, असे मिळून सहा जण पॉझिटीव्ह आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या