CORONA – राज्यात साडेनऊ हजारांवर कोरोनाचे नवीन रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आज 3906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.62 टक्के असून आतापर्यत बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 69 हजार 569 झाली आहे. कोरोनाचे 9518 नवीन रुग्ण सापडले असून सध्या राज्यात 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज 258 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.82 टक्के एवढा आहे. मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-64, ठाणे-7, ठाणे मनपा-12, नवी मुंबई मनपा-8, कल्याण-डोंबिवली मनपा-22, उल्हासनगर मनपा-4, भिवंडी-निजामपूर मनपा-7, पालघर-1, वसई-विरार मनपा-11, रायगड-8, नाशिक-5, नाशिक मनपा-10, नगर-1, नगर मनपा-1, धुळे मनपा-1, जळगाव-10, जळगाव मनपा-1, नंदूरबार-1, पुणे-5, पुणे मनपा-25, पिंपरी-चिंचवड मनपा-15, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

मुंबईत 1,046 नवे रुग्ण, 64 जणांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 1,046 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 64 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,193 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 71 हजार 685 वर पोहोचली आहे. मुंबईत 64 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 711 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 828 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 22 हजार 227 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 1,224 वर पोहोचली आहे.