कोरोना संकट आटोक्यात, सक्रिय रुग्णांची संख्या साडे सात टक्क्यांवर

गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट आटोक्यात येताना दिसत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या घटत असताना कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशात एकूण रुग्णांपैकी अवघे साडे सात टक्के रुग्ण सक्रिय आहेत.

गेल्या काही दिवसांत दररोज आढळणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 893 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 79 लाख 90 हजार 322 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 54 हजार 439 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 72 लाख 59 हजार 509 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच आतापर्यंत 90.85 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

देशात सध्या 6 लाख 10 हजार 803 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही संख्या एकूण रुग्णांच्या 7.65 टक्के आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 9.85 टक्के इतका आहे.

गेल्या 24 तासात 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 20 हजार 10 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या