
कोरोनाच्या उद्रेकानंतर लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील स्थलांतरीत कामगार आणि गरिब कुटुंबाच्या मदतीसाठी क्रिसील ही आघाडीची क्रेडीट रेटींग संस्था पुढे आली असून ते दररोज दहा हजार उच्च पोषणमुल्ययुक्त जेवणाची पाकिटे मोफत देण्याचा सामाजिक उपक्रम राबवत आहे. क्रिसील हे जेवण त्यांच्या मुंबईतील कॉपोरेट किचनगृहात अतिशय काटेकोर स्वच्छतेत तयार करते. सुरुवातीला दररोज पाच हजार जेवणांच्या पाकिटांची संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत मुंबईत जेवणाची दोन लाख पाकिटे वितरित करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हे वितरण सुरु राहणार असल्याचा निर्णय क्रिसीलने घेतला आहे.




























































