कोरोनामुळे दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची ट्विटरवर चर्चा

1750

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार व कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ट्विटरवर सध्या दाऊदच्या मृत्यूची बातमी ट्रेंड करत आहे. दरम्यान न्यूज एक्स या वृत्तसंकेतस्थळाने देखील याबाबतचे वृत्त कराची सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

दाऊद इब्राहिम व त्याची पत्नी मेहजबीन या दोघांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले होते.  त्यानंतर त्या दोघांनाही कराचीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने मात्र दाऊदला कोरोनाची लागण झाली नसल्याचे सांगतिले होते

आपली प्रतिक्रिया द्या