देशात कोरोना वाढतोय; सलग पाचव्या दिवशी 3 हजार रुग्ण

देशात कोराना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढत आहे. रविवारी 3157 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे देशातील ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार 500 पर्यंत पोहोचली आहे. रविवारी देशातील पॉझिटिव्हिटी रेट 0.71 टक्के होता, तो आज 1.07 टक्क्यांवर गेला आहे, तर आठवडय़ाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.68 वरून 0.70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दरम्यान, एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी देशभरातील 2723 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक दिल्लीतील 1485 रुग्णांचा समावेश असून त्याखालोखाल हरयाणात 475, केरळ 314, उत्तर प्रदेश 268, महाराष्ट्र 169, कर्नाटक 104 एवढे आहे.