
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असताना मात्र दुसरीकडे कोरोनाच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याने ऑक्टिव्ह कसेस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहावयास मिळत आहे. 15 जुलै रोजी प्रथमच 30 हजारांहून अधिक प्रकरणे प्राप्त झाली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे प्राप्त झाली आहेत.
गेल्या चोवीस तासात सोमवारी कोरोनाचे केवळ 37 हजार 164 रुग्ण आढळले. तर 41 हजार 450 रुग्ण या कोरोनाच्या आजारातून बरे झाले. 450 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अॅक्टिव्ह प्रकरणात 4 हजार 742 ची घट झाली. आता एपूण ऑक्टिव्ह प्रकरणे 5 लाख 4 हजार 916 वर पोहचली आहेत.
17 जुलैनंतर दररोज येणारी कोरोना संसर्गाची प्रकरणे पाहिल्यास 9 नोव्हेंबर रोजीची नवीन प्रकरणे दुसऱ्या क्रमांकाची होती. 17 जुलै रोजी 34 हजार 824 प्रकरणे नोंदवली गेली. यानंतर 26 ऑक्टोबर रोजी 36 हजार 104 प्रकरण दाखल झाले. 15 जुलै रोजी प्रथमच 30 हजारांहून अधिक प्रकरणे प्राप्त झाली. तेव्हापासून आतापर्यंत 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे प्राप्त झाली आहेत.



























































