देशात चार महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या ,राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटकाळातील फसलेल्या नियोजनावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात 4 महिन्यांत 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे हे सत्य लपविता येणार नाही, असा टोला त्यांनी ट्विट करत लगावला आहे.

कोरोना काळात एप्रिलपासून आतापर्यंत 1 कोटी 89 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जुलै महिन्यात जवळपास 50 लाख नोकऱ्या गेल्या, असा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. यासंदर्भातील बातमी पोस्ट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडत सरकारच्या अपयशाचा पाढा काचला आहे.

देशात गेल्या 4 महिन्यांमध्ये सुमारे 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच 2 कोटी कुटुंबांचे भविष्य अंधारात आहेत, असे असताना फेसबुकवर खोटी माहिती आणि द्वेष पसरवण्याने बेरोजगारी व अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.