लातूर जिल्हा बँकेने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत

560

देशात राज्यात कोरोना covid -19 विषाणू संसर्गजन्य रोगाने महारोगराईचे गंभीर स्वरूप धारण केले आहे. या संकटाशी झुंजण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती, संस्था पुढे आल्या आहेत. लातूर जिल्हा बँकेनेही समाजाप्रती आपले उत्तरदायित्व असल्याने या सहाय्यता निधीसाठी मदत देण्याचे ठरवले होते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार या बँकेने 1 कोटी 11 लाखांची मदतराशी उभी केली आहे. ही रक्कम लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निधीमध्ये 11 लाख रुपयांची रक्कम ही बँक कर्मचाऱ्यांनी मिळून उभी केली आहे ही विशेष बाब आहे. माजी मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनीही आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे, यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे .या निधीतून उपजिल्हा रुग्णालये , ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या