लॉकडाऊन वाढणार? पंतप्रधानांच्या निवेदनानंतर या ठळक मुद्दांबाबत स्पष्टता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी 10 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत हँडलवरून ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशातील अनेक राज्यांनी 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र अन्य राज्य केंद्र सरकार काय निर्णय घेणार यावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या 23 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’च्या घंटानाद करण्याचे आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही जणांनी सोशल डिस्टनसिंग पाळले नाही त्यामुळे टीका झाली. त्यानंतर पुन्हा एकदा 24 मार्च रोजी देशाला उद्देशून भाषण करतेवेळी त्यांनी 5 एप्रिल रोजी दिवे लावून अत्यावश्यक सेवेतील लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले. त्यालाही जनतेने प्रतिसाद दिला होता. मात्र पंतप्रधान म्हणून मोदींनी देशाला सद्य परिस्थितीची माहिती देणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलले गेले, अनेकांनी सोशल मीडियामधून तशी टीका केली होती. आता मोदी काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये मोदी कोणकोणत्या गोष्टी बोलतील या संदर्भात चर्चांना उधाण आले आहे.

1. लोकडाऊन वाढवण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता

2. संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढल्यास कोणत्या भागांना यामध्ये सूट मिळण्याची शक्यता आहे का?

3. अत्यावश्यक सेवांसोबत अन्य कोणत्या व्यवसायांना सूट मिळेल.

4. दूध आणि अन्नपुरवठा कशा प्रकारे केला जाईल.

5. देशातील जनतेला आर्थिक संकटातून मुक्त करण्यासंदर्भात एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता.

6. मोदी 1 मे पासून देशात आर्थिक आणीबाणीच्या संदर्भात काही मोठी घोषणा करणार का याकडे ही लक्ष लागले आहे.

7. देशातील जनतेतील ऐक्य आणि अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी गेल्या दोन वेळांप्रमाणे नवीन टास्क देण्याची शक्यता.

8. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने भाषणात आंबेडकर जयंतीचा उल्लेखही होण्याची शक्यता.