3 मे नंतरही शाळा-कॉलेज ‘बंद’ची शक्यता

1541
फोटो-प्रातिनिधीक

मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनासाठी रेडझोन ठरलेल्या जिल्ह्यामधील लॉकडाऊन 3 मे नंतरही उठण्याची शक्यता कमीच असल्याने या जिल्ह्यांमधील शाळा-कॉलेज बंदच राहणार आहेत लोक. लॉकडाऊनचा परिणाम केंद्रीय बोर्डासह राज्य शिक्षण मंडळाच्या निकालावर ही होणार आहे. खासगी शाळांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी यामुळे पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातील लॉकडाऊन तीन मेनंतरही वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली होती. या भागातील शाळा,कॉलेज बंद राहतील तसेच महाराष्ट्र तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात आणि राजस्थान मधील स्थानिक शिक्षण मंडळासह या जिल्ह्यांमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा ही उशिराने होतील अथवा रद्द केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा परिणाम साहजिकच निकालावर होणार असून निकाल रखडल्याने पुढील प्रवेशही उशिराने होणार आहेत.

ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी येण्याची शक्यता कमीच
रेड झोन मधील विद्यार्थी ऑगस्टपर्यंत शाळेत येण्याची शक्यता कमीच आहे असे इंटरनॅशनल स्कूल असोसिएशनच्या कविता अग्रवाल यांनी सांगितले. सध्या तरी आम्ही ऑगस्ट पर्यंतचे ऑनलाईन अभ्यासक्रम साहित्य तयार केले आहे. लेक्चर्स दाव्यानुसार व्हिडिओ तयार करून ते विद्यार्थ्यांना पाठवण्यात येत आहेत. वर्कशीटद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांचा सरावही करून घेताहेत. सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून ऑनलाइन शिकवणीवरच आमचा भर आहे असंही त्या म्हणाल्या.

लॉकडाऊन वाढल्यास शाळा कॉलेज समोर पेच
जूननंतरही लॉकडाऊन कायम राहिल्यास शाळा-कॉलेज अभ्यासक्रम, निकाल, प्रवेश याविषयी पेच निर्माण होईल असे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डीपर संस्थेचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी सांगितले. 30 एप्रिलला चालू शैक्षणिक वर्ष संपणार आहे. पहिली ते नववीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे पुढे प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने शाळांना फारसा त्रास होणार नाही. शाळा 15 जूनला सुरू होतात, त्यामुळे जूनपूर्वी लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यभर समान पातळीवर सोशल डिस्टन्स इंची खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्यास हरकत नाही असे मतही बुटले यांनी मांडले.

लॉकडाऊननंतर शाळांसमोरील पर्याय आणि आव्हाने

  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी शाळांमध्ये यापुढे फिफ्टी-फिफ्टी उपस्थिती असू शकते.
  • एकुण विद्यार्थी संख्या पैकी 50 टक्के विद्यार्थी सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी तर उर्वरित विद्यार्थ्यांना मंगळवार गुरुवार शनिवार या दिवशी शाळेत बोलावणे
  • यापुढे शाळा कॉलेजमधील स्वच्छतेला अधिक महत्त्व शाळा सॅनिटाइझ करणे
  • विद्यार्थी शिक्षकांची आरोग्यतपासणी
  • पालकांचे प्रबोधन करणे या गोष्टी शाळा-कॉलेजला कराव्या लागतील
  • जास्तीत जास्त शिक्षकांना टेक्नोसॅव्ही बनवण्यासाठी फीवाढ न करता निधीची व्यवस्था करणे
  • सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व विद्यार्थ्यांना शिकवणे, ऑनलाइन शिक्षणावर जास्त भर देणे
  • लॉकडाऊनच्या काळात प्रवेश प्रक्रिया राबवणे हे देखील शाळा समोरील मोठे आव्हान ठरणार आहे
आपली प्रतिक्रिया द्या