
राज्यात मंगळवारी 7188 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.72 टक्के असून आतापर्यत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 217 झाली आहे. कोरोनाच्या 8369 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 32 हजार 236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.
राज्यात मंगळवारी 246 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.75 टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले 246 मृत्यू हे मुंबई मनपा-62, ठाणे-3, ठाणे मनपा-3, नवी मुंबई मनपा-6, कल्याण-डोंबिवली मनपा-3, उल्हासनगर मनपा-5 भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर मनपा-4, रायगड-4,पनवेल-2, नाशिक-2, नाशिक मनपा-4, मालेगाव मनपा-1 अशी नोंद आहे.
मुंबईत 995 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू
मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 995 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 905 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 73 हजार 555 वर पोहोचली आहे. मुंबईत 62 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 814 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 893 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 43 हजार 083 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 3,262 वर पोहोचली आहे.




























































