पतंजलीचा कोरोनावर ‘राम’बाण… कोरोनील, श्वासारीवटी औषधांनी 100% रुग्णांना 7 दिवसात बरं केल्याचा दावा

पतंजलीने कोरोनावर रामबाण इलाज असल्याचा दावा करत ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणले आहे. औषधाच्या लाँचिंग कार्यक्रमात बोलताना योगगुरू बाबा रामदेव यांनी या औषधाबद्दल आणि आमच्या दाव्याबद्दल असलेल्या सगळ्या शंकाचे आमच्याकडे उत्तर आहे असं म्हटलं आहे. ‘कोरोना आजारावर अॅलोपॅथीवाले लस शोधू नाही शकले, लंगोटी धोतर घालणाऱ्यांनी हे औषध कसे शोधून काढले असा लोकं प्रश्न विचारतील’ असे रामदेव यांनी म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी हे औषध बाजारात उतरवत असताना त्याच्या सगळ्या चाचण्या घेतल्याचेही सांगितले. या चाचण्यांसाठी सीटीआरआयची परवानगी घेतली होती असं त्यांनी म्हटलं आहे.

बाबा रामदेव यांनी सांगितले की या औषधाच्या चाचण्या विविध शहरांमध्ये करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 280 कोरोनाग्रस्तांना सामील करून घेण्यात आलं होतं. यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही विशेष बाब असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. या रुग्णांमधील 69 रुग्ण हे ३ दिवसांत बरे झाल्याचे रामदेव यांनी म्हटले आहे. सात दिवसांत 100 टक्के रुग्ण बरे झाल्याचेही ते म्हणाले. ही ऐतिहासिक घटना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पतंजलीने एकूण तीन प्रकारची औषधे बाजारात आणली अशून पुढच्या आठवड्यात या औषधांच्या घरपोच विक्रीसाठी एक अॅप लाँच केले जाणार आहे. या औषधांमधील श्वासारी नावाचे औषध हे श्वसनसंस्था मजबूत करते असं रामदेव यांनी म्हटले आहे. हे औषध सर्दी, ताप, खोकला, पडसे यावरही गुणकारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोनील हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते तसेच , मधुमेह, रक्तदाब अशा अनेक गोष्टींवर प्रभावकारी आहे असे ते म्हणाले. अणुतेल हे श्वसनसंस्थेतील कोरोना विषाणू पोटात ढकलतं, पोटातील आम्ले हे विषाणू नष्ट करतात असं रामदेव यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या