कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या परिचारिकेच्या घरावर हल्ला, तात्काळ घर रिकामे करण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिनी घाटीत कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या शिल्पा अनिल हिवाळे या परिचारिकेच्या घरावर परिसरात राहणाऱ्या काही लोकांनी हल्ला केला. ‘तुम्ही कोरोना वॉर्डात काम करता. आमच्या घरासमोरून ये-जा करता. घर रिकामे करा, नाहीतर गंभीर परिणाम होतील’ अशी धमकीही त्यांनी दिली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा हिवाळे या चिकलठाण्यातील माळी गल्लीतील सावता मंगल कार्यालय जवळ राहतात. सध्या चिकलठाण्यातील कोरोना रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत आहेत. अनेक गंभीर रुग्णाची देखभाल करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना गल्लीतील काही रहिवासी घर रिकामे करा आणि दुसरीकडे जा अशी धमकी देत आहेत. रुग्णांची इमर्जन्सी सेवा करायची की घर शोधायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

घराचे दार तोडण्याचा प्रयत्न
तक्रारीनुसार काल रात्री शिल्पा आणि त्यांचे कुटुंबीय झोपलेले असताना, गल्लीतील लोकांनी त्यांचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळे जण घाबरुन गेले. त्यांना दार उघडायला भाग पाडण्यात आले, तेव्हा गल्लीतील लोकांनी त्यांच्या पतीला धमक्या देत शिवीगाळ देखील केली. या घटनेमुळे त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा इतका घाबरला की रात्रभर तो जागाच राहिला