पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. काही दिवसांपूर्वी येथील पिझ्झा डिलीव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 16 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. दक्षिण दिल्लीमधील मालवीय नगर येथील पिझ्झा डिलीव्हरी बॉयला कोरोनची बाधा झाली होती. या डिलीव्हरी बॉयने येथील अनेक कुटुंबीयांना पिझ्झाची डिलीव्हरी दिल्याने 72 कुटुंबीयांना क्वारंटाईन केले होते. तसेच संपर्कातील 16 लोकांची चाचणी केली होती. अहवाल निगेटिव्ह आले तरी अजूनही दिल्ली प्रशासनाने या 16 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. याशिवाय 72 कुटुंबीयांचे देखील होम क्वारंटाईन सुरू राहील, असे प्रशासनाने म्हटले आहे.