
कोरोनाचे संकट पाहता अनेकांनी होळी खेळण्याचे टाळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही कोरोनापासून वाचण्यासाठी होळी मिलनला जाण्यास टाळले आहे. असे असले तरी सुरक्षित होळी खेळण्याचे अनेक पर्याय आहेत. होळीचा सण वर्षातून एकदाच येतो, कोरोना वायरसमुळे अनेकांनी आपले प्लान रद्द केले आहेत म्हणून अनेकजण दुखीही असतील.
कोरोनाबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत, एकत्र जमल्याने कोरोना होतो. तसेच रंग लावल्यानेही कोरोनाची लागण होते असा अनेकांचा समज आहे. परंतु एकत्र जमल्याने फक्त कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया सुरक्षित होळी कशी खेळायची.
पाण्यात रंगपंचमी खेळणे टाळा
होळी किंवा रंगपंचमी खेळताना पाण्याचा वापर टाळावा. अनेकजण पाण्यात सामुहिकरित्या होळी खेळतात. तसेच मोठ मोठ्या टबमध्ये रंग टाकून लोक त्यातच बसून राहतात. अशात जर हे पाणी घाण किंवा दुषित झाले तर तुम्हाला विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे यंदा रंगपंचमी सारजी करताना पाण्याचा वापर टाळा.
नैसर्गिक रंगाचा वापर
रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगाचा वापर करावा. त्यात गुलाल आणि इतर रंगाचा समावेश आहे. हिंदुस्थानी बनावटीचा गुलाल नेहमीच चांगला.
सॅनेटाईझरचा वापर
रंगपंचमीच्या वेळी खाण्या पिण्याचीही सोय असते. तेव्हा आपण तशाच हातांनी खातो. हातांना रंग लागलेला असतो. अशा पद्धतीने खाणे हे अपायकारक असू शकतं. तेव्हा काही खाण्यापूर्वी सॅनेटाईझर वापरा. सॅनेटाईझर आपल्या खिशातच ठेवा. आणि आपले हात सारखे त्याने स्वच्छ करत रहा.
त्वचेला तेल लावून जा
आपण जरी नैसर्गिक रंग वापरणार असलो तरी काही जण असतात जे केमिकल रंग वापरणारे असतात. अशा रंगापासून वाचण्यासाठी चेहर्याला आणि अंगाला खोबरेल तेल लावून जा. यामुळे केमिकलचा रंग अंगाला चिकटत नाही.
मास्क आणि चश्मा
रंगपंचमी खेळताना चश्मा आणि मास्क आवर्जून लावा. चश्म्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये रंग जाणार नाही आणि डोळ्यांना इजा होणार नाही. रंगपंचमीच्या कार्यक्रमासाठी कुठे जाणार असाल तर आवर्जून मास्क लावा.
























































