
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शनिवारी चार लाखाच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात देशात 15,413 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. या वाढीचे आकडे हे देशासाठी चिंताजनक आहेत.
306 deaths and highest single-day spike of 15413 new #COVID19 positive cases reported in India in last 24 hrs.
Positive cases in India cross 4 Lakh, stands at 4,10,461 including 169451 active cases, 227756 cured/discharged/migrated & 13254 deaths: Ministry of Health pic.twitter.com/s4xzVBykVF
— ANI (@ANI) June 21, 2020
गेल्या 24 तासात देशात 306 जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा 13254 वर पोहोचला आहे. सध्या देशात 4,10,461 कोरोनाग्रस्त असून यातील 1,69,451 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 2,27,756 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 9 दिवसात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक लाखाने वाढला आहे. याआधी 13 जूनला रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला होता.
हिंदुस्थानात सर्वात पहिला कोरोनाचा रुग्ण 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तब्बल शंभर दिवसांनी म्हणजेच 18 मे रोजी हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाखांवर पोहोचला. त्यानंतर पुढच्या 15 दिवसात म्हणजे 2 जूनपर्यंत हिंदुस्थानचा आकडा 2 लाख झाला.

























































