खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार; अवाच्या सवा दरातून सामान्यांची सुटका

309

कोरोनाच्या संकटात रुग्णांची ने-आण करण्यासाठी अवाच्या सवा दर आकारतात. याला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने या रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या सर्व रुग्णवाहिका एका अॅपद्वारे नियंत्रित केल्या जाणार आहेत. इंधनाचा दर, किलोमीटर आणि परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या नियमानुसारच रुग्णवाहिकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. रुग्णवाहिकांचे नियंत्रण पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱयांकडून करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता या रुग्णवाहिका वाहन चालकासह, इंधनाच्या खर्चासह भाडे तत्वावर घेता येतील अथवा जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्वावर ताब्यात घेण्यात येतील.

24 तास उपलब्ध
खासगी रुग्णवाहिका आणि वाहने ताब्यात घेताना त्यांचा दर निश्चित करून ते उपलब्ध करून देण्यात येईल. 24 तास या ताब्यात घेतलेल्या रुग्णवाहिका आणि वाहने उपलब्ध राहतील.
– परिवहन प्राधिकरण किमान दर ठणवणार या दरामप्रमाणे खासगी वाहनचालक आकारणी करीत आहेत हे तपासण्यासाठी तपासणी यंत्रणा तयार करण्यात येईल.
– जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त त्यांच्या कार्यक्षेत्रात यंत्रणा तयार करतील.
– रुग्णवाहिकेत स्मार्ट पह्न, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री 108 रुग्णवाहिकेचे अॅप त्यात असेल ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल.
– रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना 108 क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या