संभाजीनगर महापालिकेने एक लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला, राज्यात मिळवला पहिला क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी शासन निर्देशानुसार ट्रेस-टेस्ट-आयसोलेट या प्रक्रियेचा वापर केला जात आहे. ही प्रक्रिया गतीने राबविण्यात आल्यामुळे संभाजीनगरने देशात प्रथम स्थानांवर झेप घेतली. संभाजीनगराने सर्वाधिक एक लाख टेस्टचा टप्पा पार करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे अशी माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी टिटरव्दारे दिली.

महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी आज मंगळवार 28 रोजी ट्विट करून ही माहिती दिली. संभाजीनगर शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून अँटीजेन टेस्टिंगला सुरूवात झाली. महापालिकेने दोन टप्प्यात एक लाख अँटीजेन टेस्ट किटची खरेदी केली. त्यासोबतच आरटीपीसीआर टेस्ट केल्या जात आहे. आतापर्यत शहरात 70 हजार अँटीजेन टेस्ट आणि 32 हजार आरटीपीसीआर टेस्ट झाल्या आहेत. हा आकडा राज्यातील इतर शहराच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ संभाजीनगर महापालिकेने सर्वाधिक एक लाख टेस्टचा टप्पा ओलांडत पहिला क्रमांक पटकावला आहे.