
दक्षिण अमेरिकेतून चीनमध्ये आलेल्या फ्रोझन चिकनच्या पॅकवर कोरोनाचे विषाणू आढळले होते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद पदार्थांमधून कोरोना संक्रमणाचा धोका असतो काय असा सवाल विचारण्यात येत आहे. कोणत्याही वस्तूच्या पृष्ठभागावर कार्डबार्डवर किंवा प्लॅस्टिकवर कोरोना विषाणू दीर्घकाळ राहू शकतो. त्यामुळे पॅकबंद पदार्थांमधूनही कोरोना संक्रमणाचा धोका असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
अनेक खाद्यपदार्थ थंड हवामानात ठेवले जातात. तसेच अनेक पदार्थ फ्रोझन असतात. कमी तापमानात कोरोनाचा विऑषाणू बराच काळ तग धरू शकतो. त्यामुळे अशा पदार्थांवर विषाणू असल्यास संक्रमणाचा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले. मात्र, बाहेरील वातावरणात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे असे पदार्थ विशिष्ट वातावरणातून बाहेर काढल्यावर व्हायरस तग धरण्याची शक्यता कमी असल्याचे डॉ. ज्युलियन टँग यांनी सांगितले. तसेच अशा पदार्थांच्या पॅकवरील विषाणूंचे प्रमाण आणि त्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी असल्याचे प्रो. इमॅन्युयल गोल्डमॅन यांनी सांगितले. शिंक,खोकला आणि निकटच्या संपर्कातूनच व्हारसरचे संक्रमण होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
एखाद्या खाद्यपदार्थाच्या प्रकिंगवर संकर्मित व्यक्तीची शिंक किंवा खोकल्याचे थेंब असतील आणि त्या पॅकिंगला इतरांचा हात लागल्यास संक्रमणाची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच अशा वस्तूंची पॅकिंग होणाऱ्या ठिकाणी एखादी संक्रमित व्यक्ती काम असेल तरीही संक्रमणाचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी पॅकबंद खाद्यपदार्थ घेतल्यावर काही वेळ उन्हात ठेवावे.तसेच किराण आणल्यावरही काहीवेळ मोकळ्या हवेत ठावाव. तसेच पदार्थांच्या पॅकिंगला स्पर्श केल्यावर चेहऱ्याला हात लावू नये. हात साबणाने स्वच्छ करावेत. संशोधनात पॅकबंद वस्तूंवर कोरोनाचे विषाणू आढळले आहेत, मात्र अशा वस्तूंमुळे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झालेले नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. असे असले तरी फ्रोझन खाद्यपदार्थांच्या पॅकद्वारे विषाणू पसरण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.






















































