
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी कोरोनाला न भिता स्वच्छ आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन मराठीतला आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावरून केले आहे. खूप घाबरायला होते, अस्वस्थ वाटते. आजूबाजूची परिस्थिती भीतीच वातावरण निर्माण करते…अगदी तेव्हाच आशेचा एक किरणही आपल्या आयुष्यात येतो. घाबरू नका, भिऊ नका, स्वच्छ राहा, सुरक्षित राहा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या, अशी पोस्ट सुबोधने केली आहे. या पोस्टसोबत सुबोधने फोटो शेयर केला असून त्यात सूर्यकिरणे पाहायला मिळत आहेत. आशेचा एक किरण आपल्या आयुष्यात नक्कीच येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
खूप घाबरायला होतं,
अस्वस्थ होतं,
आजूबाजूची परिस्थिती भीती च वातावरण निर्माण करते….
अगदी तेव्हाच आशेचा एक किरण ही…Posted by Subodh Bhave on Monday, March 16, 2020


























































