प्रायव्हेट ‘तेजस ट्रेन’ ३० एप्रिलपर्यंत धावणार नाही, तिकीट बुकिंग केलेल्यांना रिफंड देण्याचा निर्णय

564

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू झालेल्या प्रायव्हेट तेजस ट्रेनचे तिकीट बुकिंग थांबविण्यात आले आहे. 14 तारखेला लॉकडाऊन बाबत निर्णय जाहीर होणार असला तरी या तीन ट्रेनचे आरक्षण 30 एप्रिलपर्यंत थांबविण्यात आले आहे. आयआरसीटीसीने लखन्ऊ ते नवी दिल्ली, मुंबई ते अहमदाबाद आणि काटरा ते वैष्णोदेवी या तीन खाजगी तेजस ट्रेन सुरु केल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता.

कोरोना संसर्ग वाढण्याच्या भीतीने रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने तिकीटांचे आरक्षण सुरू ठेवले होते. आता प्रायव्हेट ट्रेनचे बुकींग बंद करण्याचा निर्णय आय‌आरसीटीसीने घेतला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता किमान ३० तारखेपर्यत तरी तेजस ट्रेन धावणार नाहीत. दरम्यान, लांबपल्ल्याच्या मेल -एक्स्रेसबाबत अजूनही काहीही निश्चित नसून या काळात ज्या प्रवाशांनी तेजस चे बुकींग केले होते त्यांचे पैसे रिफंड केले जाणार आहेत,असे रेल्वेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या