‘हा’ देश म्हणतोय कोरोना रोग नाही, ‘कोरोना’ शब्द उच्चारण्यासही बंदी, मास्क घातल्यास होते कारवाई

1613

 

जगभरात जवळपास 180 देशात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या विषाणूने 1 लाख लोकांचा जीव घेतला असून 15 लाख लोकांना याची बाधा झाली आहे. इटली, अमेरिका, स्पेन, फ्रांस, ब्रिटन या देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना एक देश असाही आहे जो कोरोनाला रोग मानतच नाही. या देशाच्या शेजारील राष्ट्रात कोरोना धुमाकूळ घालत असताना या देशाने कोरोना शब्द उच्चारण्यावरही बंदी घातली आहे.

इराणमध्ये कोरोनाने थैमान घातले असताना या देशा शेजारील तुर्कमेनिस्तान राष्ट्रात कोरोना शब्द लिहिण्यास किंवा बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क घातल्यास कारवाई करण्याचा आदेश जारी केला आहे. राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बैरडेमुकमेडोव्ह यांनी हा फतवा काढला आहे. एवढेच नातू तर विशेष एजंट लोकांमध्ये फिरत आहेत, जे कोणाकडून कोरोनाची चर्चा ऐकल्यास त्यांना तुरूंगात पाठवत आहेत.

तुर्कमेनिस्तानमध्ये आतापर्यंत एकही कोरोना प्रकरण अधिकृतपणे नोंदवले गेले नाही. ही बाब तज्ज्ञांनाही पचनी पडलेली नाही. तुर्कमेनिस्तान आपले आकडे लपवत असल्याचा आरोप होत आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी या देशाने आपल्या देशाच्या सीमा सील केल्या होत्या. त्याचवेळी चीनसह इतर देशांकडून येणार्‍या विमानांचे मार्गही वळवले होते. या देशात लोकांची थर्मल स्क्रीनिंगही केली जात आहे. परंतु, असे असूनही, इतर देशांव्यतिरिक्त तेथे जीवन सामान्य आहे. लोक मोठ्या संख्येने सार्वजनिक मेळाव्यात एकत्र येत आहेत. वाढदिवस असो किंवा लग्न, लोक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.

अमेरिकेत मृतदेहांचा खच, 3 दिवसात 6 हजार मृत्यू; अडीच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीती

आकड्यांची लपवालपवी
दरम्यान, तुर्कमेनिस्तानने असे आकडे लपवण्याची ही पहिली वेळ नाही. या देशाने एड्स आणि प्लेगसह अनेक आजारांची आकडेवारी लपवली आहे. त्याचबरोबर प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीतही 180 देशांच्या यादीत हा देश अखेरचा आहे.

राष्ट्राध्यक्ष यांचे विचित्र आदेश
कोरोनाचा पार्श्वभूमीवर या देशाच्या राष्ट्राध्यक्ष यांनी हा आजार रोखण्यासाठी एक चमत्कारिक आदेश जारी केला आहे. त्यांनी देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हरमाळा नावाची पारंपारिक वनस्पती लावण्यास सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की ही वनस्पती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय सरकारी जाहिराती, शाळा आणि भिंतींवरील कोरोनाशी संबंधित कोणतीही बाब दूर केली जात आहे. कोरोनाऐवजी श्वसन रोग किंवा आजार हा शब्द वापरला जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या