रत्नागिरीत एका कोविड योद्ध्याचा कोरोनामुळे मृत्यू

600

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात कोरोनाने दोघांचे बळी घेतले आहेत. दापोली तालुक्यातील दाभोळ आणि आंजर्ले या दोन ठिकाणी कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यू झालेल्या दोन रुग्णांपैकी एक कोविड योद्धा असून आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यकाचे रविवारी दुपारी कोरोनाने निधन झाले.

यापूर्वी दाभोळ येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. रुग्णांचे वय 60 वर्षे होते. रुग्णाला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. तसेच एकदा हृदय विकारचा झटका आला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी दुपारी दापोली तालुक्यातील आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य सहाय्यक यांचा कोरोनाने बळी घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंग्यूसदृश्य रोगाची लागण झाली होती. यात त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात 30 जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. परंतु रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात 14 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 710 झाली आहे. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 207 कोरोनाबाधित रुग्ण दाखल आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या