‘कोविड योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या आरोग्य सेविकेचा निर्घृण खून, पती स्वतःहून पोलिसात हजर

5871

‘कोविड योद्धा’ म्हणुन काम करणाऱ्या आरोग्य सेविकेचा पतीनेच दोरीने गळा आवळून खून केल्याची घक्कादायक घटना सावर्डे, ता.शाहूवाडी सावर्डे येथील आरोग्य उपकेंद्राच्या निवासस्थानात घडली. शैलेजा अरविंद पाटील (30) असे खून झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. घरगुती वादातुन हा खुन झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे माले, ता. पन्हाळा येथील असलेले हे कुटुंब दोन लहान मुलांसह सावर्डे, ता. शाहूवाडी येथील आरोग्य उपकेंद्राच्या निवासस्थानात राहत आहे. गेली दहा वर्षे ती आरोग्य सेविका म्हणून नोकरी करत असून सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेरिड येथील एका महाविद्यालयात-कोविड-19 केअर सेंटरमध्ये कोविड योद्धा म्हणून शैलजा पाटील सेवा बजावत होत्या.

गुरुवारी रात्री पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून सुरू झालेला वाद टोकाला गेला. पहाटेच्या सुमारास दोरीने गळा आवळून पतीने तिचा खून केला. याबाबत पोलिसांत हजर होऊन पती अरविंदने पत्नी शैलजाच्या खूनाची कबुली दिली. मलकापूर ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेन करण्यात आले असून पुढील तपास शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या