सुरक्षित वातावरण अन् कडक नियम

कोरोनाच्या संकटातही बीसीसीआयकडून आयपीएलच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आला. आर्थिक बाजू सावरण्यासाठी हा प्रयत्न केला गेला. मात्र जगातील कोरोना संकट अजून दूर झालेले नसल्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बीसीसीआयला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यासाठीच त्यांनी कडक नियमांचा अवलंब केला आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी, पंच, सामनाधिकारी, संघ मालक यांच्यासह संबंधित सर्वांच्याच आरोग्याची व सुरक्षेची काळजी यावेळी घेण्यात येणार आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने या स्पर्धेच्या निगडित सर्व बाबींवर दृष्टिक्षेप टाकला.

मैदानाबाहेरील बदल

 • कोरोना चाचणीसाठी 10 कोटींचा खर्च.
 • खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांची दर पाच दिवसांनंतर कोरोना चाचणी.
 • खेळाडू, सपोर्ट स्टाफना बाहेरील व्यक्तींना भेटण्याची परवानगी नाही.
 • नियम तोडल्यास खेळाडूवर काही सामन्यांसाठी बंदी लादण्यात येईल.
 • खेळाडूला दुखापत झाल्यास इतर खेळाडूला संधी देण्यात येईल.

मैदानातील बदल

 • दोन वेळा वार्ंनग दिल्यानंतरही खेळाडूंनी चेंडूला लाळ लावल्यास प्रतिस्पर्धी संघाला पाच धावा बहाल करण्यात येतील.
 • पहिल्यांदाच थर्ड अंपायर गोलंदाजांचा फ्रंट फूट नो बॉल बघणार.
 • कोरोनामुळे खेळाडू बाहेर गेल्यास कितीही वेळा पर्यायी खेळाडू बदलण्याची मुभा.
 • चीअरलीडर्स व क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये नो एण्ट्री.
 • खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी रेकॉर्डेड व्हिडीओ चालवण्यात येणार.
 • खेळाडूंना एकमेकांना हात मिळवता येणार नाहीत.

फिक्सिंग व भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी पाऊल

आयपीएलमध्ये फिक्सिंग व भ्रष्टाचार होऊ नये यासाठी बीसीसीआयकडून कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी त्यांनी स्पोर्ट रडार यांच्या सोबत हातमिळवणी केली आहे. बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथक व स्पोर्ट रडार यांची स्पर्धेशी निगडित सर्व गोष्टींवर करडी नजर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या