चिपळूणमध्ये शिवसेनेकडून गरजूना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

718

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या व्यक्तींचे हाल झाले आहेत अशा व्यक्तींसाठी शिवसेनेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हातावर पोट असलेल्या व्यक्तींची लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये याकरिता चिपळूणात शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचे गरजू लोकांना मोफत वाटप सुरु केले आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना शाखा वडनाका चिपळूण विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. बाळा कदम यांनी मदतीकरिता एक टीम तयार केली आहे. ही टिम जीवनावश्यक वस्तूंचे पॅकिंग करून वाटपाचे काम करत आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रविण पेडणेकर,राजुशेठ देवळेकर ता.समन्वयक बंधु कदम,पिंट्या कोवळे,बापू कदम,रामा जाधव बाबू कदम,दामू गुरव,तुषार गुरव,आकाश कदमसुशांत गुरव,वि हार कोवळे,ओम विषकर्मा,राजेश कदम,सिद्धेश गुरव,राहुल गुरव,अभिषेक कदम,अजय कदम,सोहम कदम,प्रणव कदम ,निखिल पवार,विवेक पवार,साईराज कदम,यश कोवळे,तेजस शिंदे,मंदार शिंदे,अवि जगदाळे अविनाश नवरत यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या