होमगार्डच्या स्वयंसेवकांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

403

कोरोना महामारीमुळे देशातील बहुतांश राज्यामध्ये सांसर्गिक विषाणूंची नागरिकांना मोठ्या प्रमाणात बाधित होऊन अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे रूग्ण संख्येमध्ये सततची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रसंगी महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या जागतिक स्तरावरील मानसेवी होमगार्ड संघटनेच्या आजी माजी कर्मचाऱ्यांना कर्तव्य सेवेत रुजू करून घेण्याची मागणी सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नैसर्गिक आपत्तीसह कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक, दळणवळण, पाणीपुरवठा ,वीजपुरवठा, आरोग्य अशा अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी शासनाने होमगार्डची स्थापन केली आहे. स्वयंसेवी होमगार्ड दलात अग्निशमन, पूरविमोचन, प्रथमोपचार, शस्त्र प्रशिक्षण ,शारीरिक कवायती प्रशिक्षण, निशस्त्र युद्ध , कायदा व सुव्यवस्था, दळणवळण वाहतूक, यासारखे विविध विषयाचे प्रशिक्षण होमगार्ड जवानांना शासनाने दिलेले आहे. राज्यात जवळपास 60 हजार प्रशिक्षित आजी माजी होमगार्ड जवान आहेत . सध्या देशात कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत वैद्यकीय व सुरक्षा सेवेसाठी अत्यंत तळागाळातील हितकारक व गुणकारक सेवा देण्यासाठी गृहरक्षक दल हिताची ठरू शकणार आहे. होमगार्डमध्ये डॉक्टर्स, नर्सेस ,वकील ,शिक्षक, खेळाडू ,वाहनचालक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी , बँका, विमा, कंपन्या,खाजगी क्षेत्रातील टर्नर वेल्डर पेंटर फिटर इलेक्ट्रिशियन असे टेक्निकल कामगार स्वयंसेवक आहेत. हे सर्वजण प्रशिक्षित जवान असून त्यांनी आजपर्यंत निवडणूका ,संप ,दंगली, भूकंप, जयंती अशा कठीण प्रसंगी शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या मदतीसाठी काम केले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन यांनी कार्यक्षेत्रातील आजी-माजी होमगार्डस जवानांना सेवेचे आव्हान केल्यास ते कर्तव्य सेवेसाठी मदतीला धावून येणार आहे. पोलीस आणि वैद्यकीय विभाग यांना होमगार्डस स्वयंसेवकांची मदत उपयोगी ठरणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्र राज्यातील होमगार्डस सदस्यांना राष्ट्रीय आपत्ती सेवा कार्यास रूजू करून घ्यावे, अशी मागणी भिसे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या