
मध्य रेल्वेवर अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्यांसाठी मुख्य आणि हार्बर मार्गावर सध्या 350 लोकल फेर्या सुरू आहेत. सोमवार 13 जुलै पासून ठाणे ते वाशी दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर आणखीन दोन फेर्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेतर्फे अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी चालविण्यात एकूण फेर्यांची संख्या आता 352 इतकी होणार आहे.
वाशी येथे जाण्यासाठी विशेष लोकल ठाण्यावरून सकाळी सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळी वाशी येथून विशेष लोकल ठाण्याकरीता सुटेल. या विशेष फेर्यांना रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. राज्य सरकारने निश्चित केलेल्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना या निवडक उपनगरी सेवांमधून प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे. इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे. या लोकल सर्व सामान्य प्रवाशांसाठी नाहीत. कोविड-19 साठीचे सर्व प्रोटोकॉलचे पालन अत्यावश्यक कर्मचार्यांनी करावे अशी विनंती रेल्वेने केली आहे.

























































