कोरोनाने मध्यमवर्गीयांची बचत खाल्ली!

783

उतारवयात, निवृत्तीनंतरची तरतूद म्हणून कर्मचाऱ्यांकडून भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) रक्कम ठेवली जाते. मात्र, कोरोनामुळे सगळेच अर्थकारण बिघडले आणि मध्यमवर्गीयांनी भविष्यासाठी केलेली बचतच खाऊन टाकले. लाखो लोक बेरोजगार झाले, अनेकांच्या वेतनात कपात झाली. त्यामुळे अवघ्या चार महिन्यात 80 लाख कर्मचारी कामगारांनी आपल्या पीएफमध्ये जमा झालेली तब्बल 30 हजार कोटी रुपयांची रक्कम काढली आहे.

एप्रिल ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही रक्कम काढण्यात आली. चार महिन्यात 30 हजार कोटी रुपयांपर्यंत पीएफमधून पैसे काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • पीएफमुळे कर्मचाऱ्यांना आधार मिळाला; पण भविष्यातील तरतुदीची रक्कम काढली गेली. नेहमीपेक्षा पीएफमधून पैसे काढण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 30 लाख कर्मचाऱ्यांनी कोविड विशेष विंडोद्वारे 8000 कोटी काढले. 50 लाख कर्मचाऱ्यांनी 22000 कोटी काढले आहेत.व्याजदर घटण्याची शक्यता
  • कोरोना काळात पैसे मोठ्या प्रमाणावर काढले जात असल्यामुळे ‘ईपीएफओ’ची गंगाजळी कमी होईल. पर्यायाने ‘पीएफ’वरील व्याज कमी होण्याची शक्यता आहे. सध्या पीएफवर 8.65 टक्के व्याजदर आहे.
आपली प्रतिक्रिया द्या