कोल्हापूरात 1 हजार 264 उद्योजकांचे ऑनलाईन अर्ज; 162 जणांचे उद्योग सुरु

349

जिल्ह्यात आज ऑनलाईन अर्ज केलेल्या 1 हजार 264 उद्योजकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्षात 162 जणांनी 4 हजार 832 कामगारांच्या सहायाने उद्योग सुरु केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कामगारांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करू शकणाऱ्या उद्योगांनी आपले उद्योग मर्यादित स्वरुपात कमीत कमी कामगार घेवून करण्याबाबत http://permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. यास आजअखेर जिल्ह्यातील 1 हजार 264 जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांना परवानगी मिळाली आहे. या उद्योजकांसाठी 18 हजार 970 कामगारांची आवश्यकता आहे. वाहतुकीच्या परवानगीसाठी 554 जणांनी अर्ज केला होता. छाननीनंतर बस, मिनी बस याच्यासाठी 240 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.प्रत्यक्षात मात्र 163 जणांनी आपले उद्योग सुरु केले असल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या कडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या