बोरगांवात 25 तोळे सोन्यासह 7 हजार नगदी घेऊन चोरटे फरार

1070

सध्या कोरोना महामारीमुळे देशावर व राज्यावर मोठे संकंट निर्माण झाले असल्याने शहरातील बरेच नागरीक  गावाकडची वाट धरत जरी असले तरी चोरीचे सत्र सुरु असल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बोरगांत (नाव्होली) येथील सदनशिल शेतकरी असलेले विनय विजयकुमार देशपांडे यांच्या घरी सोमवारी राञी 2.00 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन कपाताट  ठेवलेले 25 तोळे सोने न नगदी 7 हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाल्याची घटना 30 मार्च रोजी घडली आहे. या कोरोनाच्या महामारीमुळे अख्खा देश संकंटात सापडलेला असून पुण्या-मुंबई सह जिल्ला व तालुक्यातील नागरीक या महामारीला घाबरुन गावाकडची मिळेल त्या वहाणांनी वाट धरीत आहेत.  याच भितीपोटी लातूरला रहात असलेले देशपांडे कुटूंब   चार पाच दिवसापुर्वीच मुळ गावी आले होते. सोमवारच्या मध्यराञी 2.00 वाजण्याच्या सुमारास घरातील सगळी मंडळी झोपी गेल्याचे पहाऊन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश नगदी 7 हजार रुपये व 25 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या