आली अभ्यासाची दिनदर्शिका; घरीच शाळा भरवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातनच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आता शैक्षणिक दिनदर्शिका आली आहे. शाळेतील नियमित तासांप्रमाणे घरी बसूनही अभ्यास करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार पाठय़पुस्तकातील प्रत्येक पाठाचा घरात राहून स्वयंअभ्यास करणे शक्य होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा नियमितपणे शाळा सुरू करणे शक्य झाले नाही. म्हणून राज्य सरकारमार्फत डिजीटल माध्यमातून शिक्षण देण्याचा निणऱय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर परिषदेने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. या दिनदर्शिकेचा वापर शिक्षक, पालक यांनी अत्यंत विचारपूर्वक करून विद्यार्थ्यांचे शिकवणे, अधिक समृद्ध करणे आवश्यक असल्याची माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत विद्यार्थी या दिनदर्शिकेचा वापर करून आपल्या सकडीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेऊ शकणार आहे. ही शैक्षणिक दिनदर्शिका जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात पाठय़पुस्तकातील पाठांनुसार अभ्यास कसा करावा, असे सांगणारी आहे. ही दिनदर्शिका पीडीएफ स्करूपात परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थी- पालकांसाठी सूचना

  • पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन
  • अभ्यास करताना पाठ्यपुस्तकांचा उपयोग करावा
  • एक पाठ संपल्यानंतर स्काध्याय पूर्ण करावा
  • दररोज प्रत्येक विषयाचा अभ्यास
  • शिक्षकांनी पाठविलेल्या चाचण्याही सोडव्यात
  • प्रत्येक विषय संपल्यानंतर थोडी विश्रांती घ्या

शिक्षकांसाठी सूचना

  • ही दिनदर्शिका सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी
  • अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन करा
  • पाठ शिकताना पाठ्यपुस्तकांचा वापर कसा करायचा, याबद्दल शिक्षकांनी सूचना द्याव्यात
  • ई-साहित्य संबंधित समांतर उपक्रम आणि स्काध्याय याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधावा

प्रत्येक पाठाचे ई-साहित्य बघण्यापूर्वी आणि बघितल्यानंतर काय करावे, याबद्दल सांगावे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबू नये, यासाठी पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना स्कयंअभ्यास करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पूरक शैक्षणिक दिनदर्शिका विकसित केली आहे.? ही दिनदर्शिका ‘http://bit.ly/2YTrzj5’ या लिंकवर उपलब्ध असून प्रत्येक इयत्तेनुसार ती पीडीएफ स्करुपात डाऊनलोड करता येणार आहे.’

  • विकास गरड, उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद