लोकांच्या अनंत कला बघून हैराण झालो!

511

>> संजय मोने, अभिनेता

तुम्हाला सांगतो, या दिवसांत मी कुठल्याही समस्येला हात घातला नाही. मी निकांत आहे. आराम करतोय. भरपूर पुस्तकं वाचली. माझ्याकडे जवळपास दोन हजार पुस्तकांचा संग्रह आहे. त्यातील बरीचशी आधी वाचून झाली होती. आता काही पुन्हा वाचली. सकाळी उठायचं स्कयंपाक काय करायचा यावर चर्चा करायची. बातम्या बघायच्या. काही सिनेमा बघितले. तेही थ्रिलर, मर्डर, बँक रेडसारखे सिनेमा… पण ते बघून मी फार काही अभिव्यक्त – बिक्त झालो नाही इतरांसारखे! मला वाटेल तेव्हा फेसबुकवर टकाळवी करीत लिहित होतो. मी जुनी, मराठी गाणी शोधून, त्यातील व्यंग हेरून फेसबुकवर लिहित होतो. याच दरम्यान ‘सेकंड इनिंग’ या नाटकाचं लेखन पूर्ण करायचा प्रयत्न केला.

आमच्याकडे फॅमिलाला वेळ देणे वगैरे असा वेगळा प्रकार नसतो. तसं काम नसलं की आम्ही घरात असतो. आणि दोघं एकाचवेळी बाहेर नसतो, कारण दोघांपैकी एकजण मुलीसोबत घरी राहतो. आमच्याकडे प्रत्येकजण आपापला केळ घेतो. दुसरं म्हणजे मी कुठे गायला, वाजवायला गेलो नाही. कुठेही ऑनलाईन वगैरे आलो नाही. मी असं ऐकलंय की 64 कला असतात पण मी बघतोय की लोकांच्या अंगात वेगवेगळ्या 128 कला निघाल्या. हो फक्त शिरीष आणि ऋजुताचा शिट्टीकरील गाण्यांचा लाईव्ह कार्यक्रम आकडीने ऐकायचो. कारण शिरीष-ऋजुताने त्याचा खूप सराव केला आहे. त्यामध्ये एक प्रकारचं रिसर्च होतं. गमतीचा भाग म्हणजे लोकांनी दाढी का वाढवली तेच कळलं नाही. मला सवय आहे दाढी वाढवायची. मी बराच वेळा तसं करतो. पण लोकांनी दाढी जरी केली असती तरी त्यात त्यांचा बराच वेळ गेला असता. दाढी वाढवून काय होणार होतं…

लॉकडाऊनने काय शिकवलं, असं कुणी विचारलं तर मी सांगेन काहीही शिकलो नाही. आपण शून्य शिकलो. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हापासून हे असंच आहे. नुसतं रांग लावायला शिकलो तरी पुरं झालं असतं. बरं हा रोग आहे. तो काही राज्यकर्त्यांनी लादलेला नाही, मग त्यांच्या विरोधात जाऊन काय करताय तुम्ही?

इंडस्ट्री सुरू होईल ती सगळ्यात शेवटी! माझ्यामते अन्न वस्त्र निवारा, मग तीन महिने एकत्र राहिल्याने झालेली भांडणं, मुलांच्या फी, कपडे, शिक्षण, फॅमिलीच्या ट्रिप, त्यांचे बऱयाच दिवसांनी एकत्र जेवण या सगळ्यानंतर आमची इंडस्ट्री. मनोरंजन शेवटी… हे सगळं झाल्यावर. माणसाचं पोट भरल्यावर तो मनोरंजनाकडे वळतो. असं नसतं की मी तीन दिवस उपाशी राहिन आणि सिनेमा बघेन असं कुणीच करत नाही. जे लोक अंथरुण बघून हातपाय पसरत होते; आपल्या आईबाबा, आजीआजोबांनी शिकवलेल्या या म्हणीप्रमाणेही, ते कसेबसे सर्काईव्ह झाले. घरात आहोत, परिस्थिती संकटाची आहे, सगळं समजतंय. युरोपमध्ये महायुद्धाच्या काळात लोकांनी चार चार वर्षे काढले होते. कुणावर खापर फोडून उपयोगाचे नाही. संयमाशिवाय पर्याय नाही.

आपली प्रतिक्रिया द्या