सोलापूर – पत्नीने दिला पतीला मुखाग्नी

कोरोना रोगाचा प्रादुर्धाव टाळण्यासाठी सध्या देशभर टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असताना सोलापूरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वृद्ध वडिलांचा अत्यंसंस्कारासाठी परराज्यातं असलेले तीन मुले व मुलगी येवू न शकल्याने वृद्ध आईने आपल्या पतीला मुखाग्नी देत आपत्ये धर्म कर्तव्य पार पाडले. वडिलांचा अत्यंसंस्कार विधी मात्र मुलांना मोबाईलवरील व्हिडिओ कॉलिंगवर पहायची वेळ आली. ही घटना सोलापूरातील साई बाबाचौकात राहणाप्या बोध्दूल कुटुंबात घडली आहे. व्यंकय्या राजमलू बोध्दूल याचे वृध्दापकाळाने बुधवारी निधन झाले होते त्याच्यावर गुरुवारी शोती चौकातील वैकुठभूभित अंत्यसंस्कार करण्यात आले वृद्ध पत्नी शामलव्वा (वय 70) यांनी मुखाग्नी दिला. याबाबत माहिती अशी की व्यकटय्या राजमलू बोध्दूल पत्नी शामलव्वा याना बलराज, अनिल व कृष्णा असे तीन मुले व मुलगी सुजाता (करिमनगर) असे चार अपत्य .हे चौधे सध्या कामानिमित्त आध्रंप्रदेशातील हैद्राबाद, सिध्दपेठ करिमनगर येथे स्थायिक झाले आहेत.

सोलापूरात आई-वडिल दोघेच राहतात. बुधवारी सायंकाळी व्यंकटय्या बोध्दूल याचे वृहद्दपकाळाने निधन झाले. यावेळी पत्नी शामलव्वा ह्या एकट्याच होत्या . वडिलांच्या निधनाची माहिती परराज्यातील मुलांना देण्यात आले परंतु सध्या लाॕकडाऊन असल्याने ते येणे अशक्य होते. त्यामुळे परिसरातीत्य नागरिक व नातेवाईकीनी मदतीचाहात देत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. व्यंकटय्या बोध्दूल यांना भाऊ पुतण्यानसल्याने पत्नी शामलव्वा यांनीच मुखाग्नी द्यावे असे समाजातील प्रतिष्ठित व नातेवाईकानी ठरविले. त्याप्रमाणे मोजक्या लोकासह शाती चौकातील वैकुंठ स्मशानभूमित शामलव्वा हिनेच अंत्यसंस्काराचे विधी करत पतीला मुखाग्नी दिला. दरम्यान वडिलांचा अत्यसंस्कार मुलांनी नातेवाईकांच्या मदतीने व्हिडिओकाॕलिंगवर पहात अंत्यदर्शन घेत अश्रू ला वाट मोकळे करून दिले. वडिलांचा दहावाविधी 11 एप्रिल रोजी अनुन यावेळी ही मुलांची, सुन नातवडे उपस्थित राहू शकत नाहीत, अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या