
गेल्या वर्षी मार्च महिन्यात टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर उपविजेतेपदावर समाधान मानणाऱया हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने तिथपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीए. कोरोनाचा फटका यावेळी हिंदुस्थानी महिला संघाला बसला आहे. मात्र तब्बल एक वर्षानंतर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्थान – दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मार्च महिन्यात टी-20 व वन डे मालिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका क्रिकेट मालिकेचे संभाव्य वेळापत्रक
- पहिली वन डे – 7 मार्च
- दुसरी वन डे – 10 मार्च
- तिसरी वन डे – 12 मार्च
- चौथी वन डे – 14 मार्च
- पाचवी वन डे – 17 मार्च
- पहिली टी-20 – 20 मार्च
- दुसरी टी-20 – 22 मार्च
- तिसरी टी-20 – 24 मार्च
पाच वन डे, तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार
हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 7 मार्चपासून पाच वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका लखनौ येथे खेळवण्यात येणार आहे. कानपूर हे ठिकाणही पर्याय म्हणून ठेवण्यात आलेले आहे.



























































