
महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच नगरमध्ये तीन रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. या तीन जणांचे रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी घेतले गेले होते व त्यांना देखरेखीसाठी येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये ठेवले होते. मात्र दुपारनंतर तिन्ही रुग्ण पळून गेल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
नगर शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी शहरांमध्ये 16 जणांचे रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे आज जिल्हा रुग्णालयांमध्ये चार जणांचे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यांना देखरेखीसाठी जिल्हा बुलढाणामध्ये दाखल केले होते. ज्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्यांचा अहवाल एक-दोन दिवसांमध्ये प्राप्त होणार होता. मात्र आज कोणालाही न सांगता ते तीन रुग्ण जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भातील तक्रारही दिली आहे.





























































