
परभणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सर्वत्र मोठी खबरदारी घेतली जात आहे. सेलूचे प्रशासन देखील याबाबत अधिक जागरूक झाले असून शहरासाठी विशेष कृती आराखडा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. भविष्या मध्ये सेलू शहरा मध्ये जर दुर्दैवाने कोरोना आजाराचा रुग्ण सापाडला तर सेलू शहरासाठी कंटेनमेंट झोन कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या झोन मध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व शिक्षक असे 80 कर्मचार्यांचे प्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे आज झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे चार बॅच मध्ये घेण्यात आले.
कंटेनमेंट झोन म्हणजे एखाद्या भागा मध्ये कोविड 19 चा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या घराच्या आजू बाजूच्या एक हजार घरांचा परिसर बंद केला जातो. त्या परिसरा मध्ये कोणताही आतील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही व बाहेरील व्यक्ती आत जाऊ शकत नाही, या पद्धतीने सील केल्या जातो. त्या नंतर त्या पूर्ण एक हजार घराचे विहित नमुन्यात प्रत्येक घराचे सर्व्हेक्षण केले जाते ,एका टिम मध्ये दोन सदस्य असतात आणि ते दोन सदस्य 50 घराचे सर्व्हेक्षण करतात. 5 टिम मागे एक पर्यवेक्षक व 1 वैद्यकीय अधिकारी असतो. आणि हे सर्व्हेक्षण दररोज 14 दिवस केले जाते त्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तीचे ही तपासणी करून विलगीकर कक्षा मध्ये भरती केले जाते. कंटेनमेंट झोन मधील सर्व कुटुंबाणा जीवन आवश्यक वस्तूचा पुरवठा केला जातो. त्या भागातील संशयित व्यक्तीचा व सहवासितांचा स्वाईब घेतला जातो.
या पद्धतीने कृती आराखडा शहरी भागासाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे याच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय हरबडे यांनी तयार केला आहे. डॉ.हरबडे व तालुका आरोग्य अधिकारी रावजी सोनवणे यांनी आज संबंधित टीमचे प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यात आले आहे.
































































