
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1180 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 53 हजार 463 वर पोहोचली आहे.
मुंबईतील गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एवूâण मृतांची संख्या आता 4 हजार 827 झाली आहे. 41 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 46 पुरुष तर 22 महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय हे 40 वर्षाखाली होते, 41 जणांचे वय हे 60 वर्षांवर होते तर उर्वरित 24 रुग्ण हे 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मुंबईत सध्या कोरोनाचे 24 हजार 424 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट हा 41 दिवसांवर आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या