आता आले ‘कोरोना वेडिंग स्पेशल पॅकेज’

861

कालानुरूप विवाहाचे स्वरूप बदलत आहे. सध्या अनेक शाही विवाह चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकदा अशा विवाहांचे सारे मॅनेजमेंट इव्हेंट कंपनीकडे सोपवले जाते. परंतु, यंदा कोरोनाचे सावट या विवाहांवरही पडले. आता पन्नास लोकांच्या उपस्थित विवाहाला परवानगी दिली. त्यामुळे काही इव्हेंट कंपन्यांनी आपल्या वेडिंग पॅकेजमध्येही बदल करत ‘कोरोना वेडिंग स्पेशल पॅकेज’ देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वऱ्हाडी मंडळींसाठी एन 95 मास्क, वधू-वरांसाठी स्पेशल डिझायनर मास्क, थर्मल क्रिनिंग, युव्ही हॅण्ड सॅनिटायझर, स्टॅण्ड सॅनिटायझर यांचा पॅकेजमध्ये समावेश होऊ लागला आहे.

काळानुसार विवाहाचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी चार-चार दिवस चालणारा विवाहसोहळा आता एका दिवसात उरकला जात आहे. दारामध्ये होणाऱया विवाहासाठी घरातील मंडळीच सजावट करत आणि आजूबाजूच्या बायका गोळा होऊन वऱहाडीमंडळींसाठी जेवण तयार करीत. वाढप्याची कामेही गावकरी करीत. पण, काळानुसार यात बदल होत गेला. दारातील विवाह कार्यालयात होऊ लागले. सजावट करणारे, केटरर्स, बॅण्डपथक अशा वेगवेगळ्या ऑर्डर द्यायला लागत. पुढे काळानुसार यात आणखी बदल होऊन वाढदिवस, साखरपुडा, विवाह आदी सोहळ्यांचे व्यवस्थापन इव्हेंट कंपन्या करू लागल्या.

साखरपुडय़ापासून ते विवाह होण्यापर्यंत सर्व व्यवस्थापन या इव्हेंट कंपन्या पाहतात. त्यामध्ये स्टेज, हॉलची सजावट, केटरर्स, फुलांची रांगोळी, नववधू मेकअप, वधूची डोली, मेहंदी, फोटो, व्हिडीओ, प्री-वेडिंग शूट, पुरोहित आदी गोष्टींचा समावेश या पॅकेजमध्ये होतो. सध्या कोरोनाची पार्श्वभूमी पाहाता त्यामध्ये ई-डिझायनिंग लग्नपत्रिका, वऱहाडी मंडळींसाठी एन 95 मास्क, वधू-वरांसाठी स्पेशल डिझायनर मास्क, थर्मल क्रिनिंग, युव्ही हॅण्ड सॅनिटायझर, स्टॅण्ड सॅनिटायझर यांचा पॅकेजमध्ये समावेश होऊ लागला आहे. तसेच, वेब टेलिकास्टिंगचाही त्यामध्ये समावेश होत आहे.

कोरोना महामारीचे हे संकट कधी टळेल, ते माहीत नाही. तसेच, पूर्वीप्रमाणे लग्नसोहळे होतील की नाही, ते ही माहीत नाही. त्यामुळेच आता या इव्हेंट कंपन्यांनीही आपल्या वेडिंग पॅकेजमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून, काळानुरूप हे बदल करणे गरजेचेच झाले आहे.

कोरोनाचे संकट पाहाता ते कधी टळेल आणि पूर्वीप्रमाणे परिस्थिती कधी होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे वेडिंग पॅकेजमध्ये बदल केला आहे. त्यामध्ये ई-डिझायनिंग कार्ड, वऱहाडी मंडळींसाठी मास्क, वधू-वरांसाठी स्पशेल डिझायनर मास्क, थर्मल क्रिनिंग, स्टॅण्ड आणि हॅण्ड सॅनिटायझर, लग्न सोहळ्याचे वेब टेलिकास्टिंगचा समावेश या पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. – नाना कामठे, गणराज डेकोरेटर्स, पुणे.

आपली प्रतिक्रिया द्या