मसुरेत बुडणाऱ्या दाम्पत्याला जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

गडनदी पात्रातून मसुरकर जुवा बेटावर होडीतून जात असताना होडी पलटी होऊन अपघात झाला. प्रकाश व विद्या चव्हाण हे दाम्पत्य नदीत फेकले गेले. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या त्यांच्या मुलाने आई वडील नदीत पडल्याचे पाहताच आरडाओरडा केला. तर बुडणाऱ्या दाम्पत्यानेही आरडा ओरड सुरू केला. त्यानंतर अशोक, सुरेश, एकनाथ, रामदास मसुरकर या ग्रामस्थांनी दुसऱ्या होडीच्या मदतीने नदीत वाहत असलेल्या चव्हाण दाम्पत्याला वाचवले. मुसळधार पावसात नदी पुररेषेवरून वाहत असताना हा अपघात घडला. चव्हाण दाम्पत्य नेहमीप्रमाणे मसुरे येथून सायंकाळी उशिरा मसुरकर बेटावर घरी जात होते. मात्र पाण्याच्या वेगात होडी पलटली होती.