कोविडमुळे रुग्णालयाचे काम रखडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथे 200 खाटांचे सामान्य रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर एकत्रित बांधकाम 2019पासून सुरू आहे. कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काम बंद होते, पण आता हे बांधकाम एकत्रितपणे सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गावर किंवा जिल्ह्यात अन्यत्र होणाऱ्या अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात तातडीन उपाय करण्यात येतात, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. श्रीनिवास वनगा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.