मुंबईत कोरोना लसीकरणाला दोन दिवस स्थगिती, कोविन ऍप बिघडले

कोरोना लसीकरण करत असताना केंद्र सरकारच्या कोविन ऍपमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील लसीकरणाचे काम रविवार, 17 आणि सोमवार, 18 जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना लसीकरणाच्या कामासाठी संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे आज अनेक ठिकाणी हे ऍप बंद होते. त्या पार्श्वभूमीवर आज ऑफलाइन नोंदी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या