
निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथे आज्ञात व्यक्तीने गोठ्याला लावलेल्या आगीत एक गाय होरपळून जागीच ठार झाली. तर दोन बैल जळाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यातील भुतमुगळी येथील शिवारात सौदागर विठ्ठल उनसनाळे यांची नऊ एकर जमीन आहे. शनिवारी सांयकाळी दोन बैल एक गाभन गाय गोठ्यात बांधून ते घरी गेले. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने गोठ्याला आग लावली. त्यात गाय जळून जागीच ठार झाली तर दोन बैल गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. गोठ्यात ठेवलेले शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. तलाठी डी.टी.जाधव व मंडळ अधिकारी जी.आर खुरदे यांनी पंचनामा केला असून कासार शिरसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
























































