घातक शस्त्रप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घातक शस्त्रे घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. अराफत ऊर्फ आरिफ लोखंडवाला असे त्याचे नाव असून त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि 27 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. 2003मध्ये अशरतने वाशी येथे एका विकासकाची हत्या आणि एका व्यक्तीवर प्राणघातक हल्लादेखील केला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

भायखळा येथे एक जण घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी शहनिशा केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. शनिवारी खंडणी विरोधी पथकाने भायखळा येथे सापळा रचून अराफतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली. अराफत हा डोंगरीचा रहिवासी असून त्याच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न करणे आणि फसवणुकीचे गुन्हेदेखील दाखल आहेत. शस्त्र्ाप्रकरणी अराफतला आज अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो भायखळा येथे कोणाला शस्त्रे देण्यासाठी आला होता याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.