बांगला देश क्रिकेट बोर्डाची संजय बांगर यांना फलंदाजी सल्लागारपदाची ऑफर

569

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना आपल्या संघाचे फलंदाजी सल्लागारपॅड स्वीकारण्याची ऑफर दिली आहे. बांगर यांनी बांगलादेश संघाला कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी मजबूत करण्यासाठी सल्ला द्यावा असे बोर्डाचे म्हणणे आहे.

हिंदुस्थानी संघात सलामीवीर फलंदाजी करणारे माजी कसोटीपटू संजय बांगर गेली अनेक वर्षे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. पण विश्वचषकातील संघाच्या अपयशानंतर बांगर यांच्यावरच सपोर्ट स्टाफमधून डच्चू स्वीकारण्याची वेळ आली.त्यांच्या जागी बीसीसीआयने आता विक्रम राठोड यांची नियुक्ती केली आहे. बांगर यांनी 2014 ते 2019 अशी 5 वर्षे टीम इंडियाचे फलंदाजी कोच म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. 47 वर्षीय बांगर टीम इंडियाकडून 12 कसोटी आणि 15 वन डे लढती खेळले आहेत.

आम्ही नव्या जबाबदारीसाठी बांगर यांच्याशी बोललो आहे ,त्यांच्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा आहे. बांगर यांनी बांगला देश क्रिकेट संघाला कसोटी फलंदाजीत मजबूत करावे अशी आमची इच्छा आहे – निजामुद्दीन चौधरी (बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी)

आपली प्रतिक्रिया द्या